थेट मजकुराकडे जा
WellbeingZen पुस्तकांशी मनमोकळ्या गप्पा
कथासंग्रह

व्यक्ती आणि वल्ली: माणसं बघायला शिकवणारं पुस्तक

पु.लं.नी रेखाटलेली वीसेक माणसं. काही हसवतात, काही चटका लावून जातात. आणि प्रत्येकात कुणीतरी ओळखीचं सापडतं.

लेखकपु. ल. देशपांडे
प्रकाशकमौज प्रकाशन
भाषामराठी
वाचनाचा ढंगसहज

व्यक्तिचित्रं लिहिणं हा मराठीत एक स्वतंत्र प्रकार आहे, आणि त्याचा मानदंड म्हणजे हे पुस्तक. पु.लं.चं कौशल्य असं की ते माणसाची थट्टा करतात, पण त्याला कधीच लहान करत नाहीत.

अंतू बरवा

या एका व्यक्तिचित्रासाठी हे पुस्तक विकत घेण्यासारखं आहे. कोकणातला एक फाटका माणूस, ज्याच्याकडे काहीच नाही पण जो कुणासमोर वाकतही नाही. शेवटच्या ओळी वाचून बरेच दिवस डोक्यातून जात नाहीत.

टीका

काही व्यक्तिचित्रं थोडी लांबतात, आणि दोन-तीन ठिकाणी तोच विनोदाचा साचा पुन्हा येतो. पण संग्रहाचा तोल त्यामुळे बिघडत नाही.

कुणी वाचावं

ज्यांना आजूबाजूची माणसं नीट बघायला शिकायचंय त्यांनी. लेखक व्हायचं असेल तर तर हे अभ्यासाचं पुस्तक आहे.

हा लेख उपयोगी वाटला?ज्यांना वाचायला आवडते त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

वाचन विभाग Uncategorized

error: Content is protected !!