सगळी परीक्षणं

कट्ट्याबद्दल

कट्टा म्हणजे काय, हे मराठी माणसाला सांगावं लागत नाही. दगडी ओटा, वर बसलेली चार डोकी आणि कुठलाही विषय निघाला की सुरू होणारा वाद. बुक कट्टा तेच आहे, फक्त विषय ठरलेला – पुस्तकं.

इथे प्रत्येक पुस्तकाचं कौतुक होत नाही. काही पुस्तकं आवडली म्हणून लिहितो, काही खटकली म्हणून. दोन्ही तितक्याच स्पष्टपणे. कारण खरं परीक्षण म्हणजे प्रकाशकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर पुन्हा लिहिणं नव्हे.

तुम्हाला काही सुचवायचं असेल, एखाद्या परीक्षणाशी भांडायचं असेल किंवा तुमचं स्वतःचं परीक्षण पाठवायचं असेल तर खाली लिहा. कट्टा सगळ्यांचा आहे.

error: Content is protected !!